हिंदजागर न्यूज , प्रतिनिधी , पुणे – पुण्यात ‘नाईट कल्चर’वर आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही काही हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मध्य पार्टी आणि त्यामधून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे सर्व प्रकार अजूनही सुरू असल्याचे दिसत आहे. पुणे शहरातील डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये शनिवारी ( दि. २२) पहाटे पाच वाजेपर्यंत मध्य पार्टी जोरात सुरु होती. या मध्य पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहात जाऊन ड्रग्स घेत होते. या प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
शहरात अल्पवयीन तरुणांना दारू देण्यास बंदी असताना देखील या हॉटेलमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू दिल्याचे समोर आले आहे. कल्याणी नगर पोर्शे कर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पब, बार, रुफ टॉप हॉटेल वर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हॉटेलमध्ये मद्य पार्टी आणि ड्रग्ज पार्ट्या जोरात सुरू असल्याने पोलीस नेमके करतायेत काय ??? या अगोदर सुद्धा या रोडवरील एफ.सी रोड सोशल यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत व या ठिकाणी चालू असलेल्या लेट नाईट पार्टी बाबत अनेक वेळा तक्रार करून सुद्धा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करीत नाही , तसेच शिवाजीनगर गावठाण या हॉटेलधारकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केले आहे व पहाटेपर्यंत हे हॉटेल चालू असते तसेच सेनापती बापट रोड येथील एजंट जॅक या रूट टॉप हॉटेल पहाटेपर्यंत चालू असते तसेच या ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर बांधकाम असल्याबाबतची या अगोदर तक्रार केली होती जर आपण छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन , चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक – ६ येथे मी केलेल्या पुराव्यासहित तक्रारी अर्ज पाहिले तर त्यावरती आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही यावरून हे सिद्ध होतं कि संबंधित पोलीस स्टेशनचे काही अधिकारी यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार करून या हॉटेलधारकांना पुरावे देऊन सुद्धा पाठीशी घालत आहे जर या आधीच मी केलेल्या पुराव्या सहित तक्रारी अर्जावरती पोलिसांनी कारवाई करायची भूमिका घेतली असती व पुणे महानगरपालिकेने बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई केली असती तर कदाचित आज या हॉटेलधारकांनी छत्रपती शिवाजीनगर मध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या तंबीला केराची टोपी दाखवली नसती असा प्रश्न या अगोदर संपूर्ण शहरातील रूफ टॉप व रात्री उशिरा चालणाऱ्या या पार्ट्यांबाबत तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश प्रकाश शेठ निकम यांनी आज पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
एल थ्री लेजर लाऊंज हॉटेलमधील हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हॉटेलमध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथे हा प्रकार घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या हॉटेलवर पोलीस आणि एक्साईज विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. हॉटेल मालक आणि पार्टी आयोजकांची चौकशी सुरू आहे.
आता तरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कंबर कसून एफ.सी रोड येथील व सेनापती बापट रोड येथील या बेकायदेशीर हॉटेल वरती कारवाई केली पाहिजे छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील श्री.कुंभार पोलीस कॉन्स्टेबल या सर्व हॉटेल धारकांना होता व मदत करत आहे .जर अशा व्यक्तींमुळे पुणे शहराच्या प्रतिमेला धक्का लागत आहे व तरुण पिढी खराब होत आहे छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे त्वरित निलंबित करण्यात यावे व संबंधित पोलीस कॉन्स्टेबलची कालच या पोलीस स्टेशनवरून बदली झाली आहे पण असे श्री.निकम यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले .