हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही, असं पवारांनी सांगितलं आहे त्यामुळे अजितदादांचं टेंशन वाढलंय.शरद पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे अजित पवारांचं टेंशन वाढवणार आहेत. कारण पवार अजित पवारांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सध्या किती ताकद आहे ते पाहूयात…विधानसभेत अजित पवारांचे 40 आमदार आहेत. तर शरद पवारांचे 13 आमदार आहेत. लोकसभेत अजित पवारांचा एकच खासदार आहे. तर पवारांचे 8 खासदार आहेत. विधानपरिषदेत अजितदादांकडे 5 आमदार आहेत. तर पवारांकडे 2 आमदार आहेत. राज्यसभेत अजित पवारांकडे दोन खासदार असून शरद पवारांकडेही दोन खासदार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एण्ट्री नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे अजित पवारांना आमदार सांभाळण्याचं तेवढं टेंशन नव्हतं. मात्र अचानक पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.
काही आमदार याला अपवाद असतील असं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे अजित पवारांचं चांगलच टेंशन वाढलंय. मात्र पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे विधान केल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.
लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितल्यामुळे राष्ट्रवादीतल्या दुस-या फळीत उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आता पवारांनी गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांनाही दारं खुली असल्याचं सांगितल्यामुळे केवळ अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काहीजण नक्कीच अस्वस्थ झाले असतील. मात्र शरद पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेंशन अजितदादांचंच वाढलं असेल हे मात्र नक्की.
Repoter – विनोद वाघमारे.