हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – गेल्या आठवड्यापासून पुणे मॉन्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. परिणामी डोंगर कपाऱ्यांवरील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. लोणावळा हे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे.त्यामुळे पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटकांचे पाय आपोआप लोणवळ्याकडे खेचले जातात. अशात लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो होणे म्हणजे पर्वणीच असते. मात्र, कधीकधी उत्साहाच्या भरात दुर्दैवी घटनाही या परिसरात घडतात. अशीच एक घटना भुशी डॅम परिसरात घडली आहे.
पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आलं होतं. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडले आहेत. इतर 2 मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
अन्सारी कुटुंब भुशी डॅमजवळील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते बघता बघता पाण्यात वाहून गेले. तेथे उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी वेळ खूप कमी होता. काही क्षणात ते दिसेनासे झाले. दरम्यान या दुर्घटनेनंतर 36 वर्षीय महिला, एक 13 वर्षीय आणि एका 8 वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय 9 वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थाप बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.
1) साहिस्ता लियाकत अन्सारी(वय36)
2) अमिमा आदिल अन्सारी(वय13)
3) उमेश आदिल अन्सारी(वय8)
या तिघींचे मृतदेह सापडले असून
4)अदनान सबाहत अन्सारी(वय4)
5)मारिया अकिल सय्यद (वय 9)
या दोघांचे मृतदेह अद्याप मिळाले नसून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
Repoter – विनोद वाघमारे