हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुण्यात एरंडवणे येथील आणखी एका ३५ वर्षीय वर्षाच्या गर्भवतीला झिकाची लागण झाली आहे. तिचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह आला. शहरातील एकूण झिका पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ झाली आहे. त्यापैकी दाेन महिला गर्भवती आहेत. तर एकटया एरंडवणेतील रुग्णांची संख्या ४ झाली आहे.ही गर्भवती महिला एरंडवणेतील गणेशनगर येथील रहिवाशी असून ती १६ आठवडयांची गर्भवती आहे. या महिलेला संसर्ग झाल्याने तिच्या बाळामध्ये विकृती निर्माण हाेण्याची शक्यता वाढली आहे, तसेच, पालखीच्या पार्शवभूमीवर शहरात झिका संसर्ग वाढण्याचा धाेकाही निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या हद्दीत एरंडवणेत २१ जून राेजी दाेन झिकाचे रुग्ण सापडले. यामध्ये ४६ वर्षांचा डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचे निदान झाले. त्यानंतर मुंढवा येथे ४७ वर्षांची एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. एरंडवणेतील गणेशनगर येथील २८ वर्षीय गर्भवतीला लागण झाली आहे. आता त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे.झिका जीवघेणा आजार नाही. ताप, डाेकेदुखी, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येतात आणि उपचारांनी ती जातात. परंतु, त्याचा खरा धाेका गर्भवती महिलांच्या बाळांना आहे. गर्भवतीला लागण झाल्यास तिच्या बाळामध्ये मायक्राेसेफेली म्हणजेच त्याच्या डाेक्याचा घेर हा नेहमीच्या तुलनेत छाेटा हाेऊ शकताे. तसेच, इतर विकृतीही निर्माण हाेऊ शकतात.
महापालिकेचे प्रयत्न अपुरे ??
झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आराेग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण, गर्भवती महिला सर्वेक्षण, डासांचे सर्वेक्षण व इतर उपाययाेजना केल्याचे सांगितले मात्र, तरीही झिकाचा संसर्ग काही आटाेक्यात येताना दिसत नाही. त्यातच गर्भवती महिलांना संसर्ग हाेणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धाेक्याचे समजले जाते.
उपाययोजना !
* झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पुर्ण बाहयांचे कपडे वापरावे.
* Mosquito Repellent चा वापर करावा.
* आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका.
* घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदला.
* पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाका.
* खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळया बसवा.
* आठवडयातुन एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासुन पुसून कोरडी करा.
* घराच्या परिसरातील अडगळीची साहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवा.
* तापात ऍ़स्पिरिन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेण टाळा. ती धोकादायक ठरु शकतात.
* कोणताही ताप अंगावर काढु नका.घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच डास चावणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
झिका विषाणुग्रस्त व्यक्तीसोबत लैंगीक संबंधातुन सदर विषाणु पसरु शकतो त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी.
Repoter – विनोद वाघमारे.