हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुणे येथील सत्यम इंडस्ट्रियल इस्टेट, एरंडवणे या ठिकाणी रस्त्यालगत एका इमारतीच्या आवारात श्री दत्तात्रयांचे छोटे मंदिर गेल्या ३०-३५ वर्षांपासून अस्तित्वात होते; परंतु जॉन थॉमस या ख्रिस्ती व्यक्तीच्या एका पत्रावर प्रशासनाने दत्तगुरूंचे मंदिर रात्री १२ वाजता पाडले.
पुणे महानगरपालिकेने रात्री १२ वाजता या मंदिरावर कारवाई चालू केली. पोलीस- प्रशासनाने स्थानिक नागरिक व दत्तभक्त यांना रोखून धरले आणि सदर मंदिर रस्त्यात नसतांनाही, तसेच कुणाला कसलीही माहिती न देता मंदिर पाडून दत्तगुरूंची मूर्ती नेली. त्यानंतर सकल हिंदु समाज आणि संघटना यांच्या वतीने त्वरित तेथील ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आणि प्रशासनावर आणलेल्या दबावानंतर काहीच घंट्यांत दुपारी श्री दत्तगुरूंची मूर्ती महानगरपालिका प्रशासनाकडून परत मिळवून त्याच पडलेल्या मंदिराच्या ठिकाणी स्थापित करण्यात आली. वरपेभूषण नावाच्या ‘इंस्टाग्राम’ खात्यावरून ही माहिती प्रसारित झाली आहे. अन्य सामाजिक माध्यमांवरही ही माहिती प्रसारित होत असून प्रशासनाच्या हिंदूविरोधी कारवाईविषयी हिंदुत्वनिष्ठांनी संताप व्यक्त केला आहे.
२ मार्च २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेला टॅग करून बोपडी येथील मेट्रो पिलरच्या खाली असलेल्या अवैद्य मजार / दर्गा बाबत रीतसर पुराव्यासहित तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीला तक्रार क्रमांक T47413 असा पडला आहे आणि अजून पर्यंत त्यावरती कारवाई नाही मग ३० ते ३५ वर्षांपासून अस्तित्वात असलेले दत्त महाराजांच्या मंदिरा ख्रिस्ती व्यक्तीच्या एका पत्रावर प्रशासनाने चक्क रात्री १२ वाजता पाडले त्यामध्ये स्थानिक राजकीय पाठबळाची व हे काम केले नाही. पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग अधिकारी याच्या विरोधात मोठा आणि कडवट आवाज उठवणार . हिंदूंच्या मंदिरावर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अवैध मजारी, दर्गे, मदरसे किंवा अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे यांवर मात्र कारवाई करण्यास घाबरते !
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम ( कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता )
त्यानंतर तेथे श्री दत्तगुरूंची आरती आणि छत्रपती शिवरायांची ‘शिववंदना’ आयोजित करण्यात आली. त्याच ठिकाणी भव्य मंदिर जिर्णोद्धाराचा संकल्प झाला आणि सर्वांनी यात सहकार्य करून योगदान देण्याचे ठरवले. यावर पुणे महानगरपालिकेची भूमिका अद्याप समजू शकली नाही.
Repoter – गणेश मारुती जोशी .