हिंदजागर प्रतिनिधी, पुणे – शहरात झिकाचे आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या 42 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर, खराडी येथील एका 22 वर्षीय तरुणाचाही अहवाल शनिवारी उशिरा पॉझिटिव्ह आला असून शहरातील झिका रुग्णांची एकूण संख्या 12 वर पोचली आहे.
महिलेला एक ते दीड आठवड्यापासून व्हायरल फिवर सारखा त्रास वाटत होता, एक दिवस फिवर बरोबर रॅश आल्याने संबंधित रुग्णालयाच्या फिजिशियनने जी का व्हायरसचे सॅम्पल एन आय व्ही ला पाठवले असता ते पॉझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये रक्ताची चाचणी निगेटिव्ह आणि युरीन रिपोर्ट पॉझिटिव आहे. 42 वर्षाची सदर महिला (गरोदर नसून)आता बरी झाली असून घरी आहे .सदर महिलेची सर्व ट्रीटमेंट ओपीडी बेसिस वर करण्यात आली आहे .तिच्या राहत्या भागात व हॉस्पिटलमध्ये केवळ एक किलोमीटरचे अंतर असून सदर भागामध्ये कीटकशास्त्रीय व इतर उपाययोजना चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
Repoter – प्रदीप कांबळे .