हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – पुणे शहर जिल्हा मातंग समाजा तर्फे दि. १ ऑगस्ट रोजी लोकशाहिर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्कार • वीर फकीरा पुरस्कार, मुक्ता साळवे पुरस्कार दिले जातात.
हे पुरस्कार देण्याचा हेतूच हाच आहे की मातंग समाजातीलच व्यकीचे कार्याचा त्यांचे समाजासाठीचे योगदान तसेच. तरुणांनी सतत समाजकार्यात सक्रीय रहावे यासाठी. प्रोत्साहान देणे, पाठीवर कौतुकाची थाप देणे, हा आहे. व हे पुरस्कार हे समाजातील जेष्ठ व्यक्तींच्या समितीमार्फत कार्यअहवाल पाहुनच अत्यंत पारदर्शक पणे दिले जातात परंतु विध्यमान स्वागताध्यक्ष व सचिव यांनी पक्षिय राजकारण पुणे शहर जिल्हा मातंग समाजात आणून दोघांनी मिळुनच कोणालाही विश्वासात न घेता पुरस्कार समिती न करता हे वरील पुरस्कार घोषित केले या वर्षी हे पुरस्कार पक्षीय राजकारण करीत भा.ज.पा च्या अर्चना तुषार पाटील या महिलेस घोषित केला.व समाजा बाहेरील तसेच मातंग समाजावर अन्याय करणा-या व्यक्तींना पुरस्कार दिला असा आरोप मा. ॲड.राजेश्रीताई अडसूळ यांनी केला आहे.
स्वागताध्यक्ष सदाभाऊ ढावरे या महिलेचा कार्यकर्ता असल्याने त्यानी समाजातील ज्येष्ठ, वरिष्ठ, संघटना प्रमुख व समाज बंधू भगिनि यांना न कळवता व प्रोटोकॉल प्रमाणे पुरस्कार समिती स्थापन न करता हा गैरप्रकार केला असाही आरोप मा. ॲड. राजेश्रीताई अडसूळ यांनी केला आहे.
दि. १ ऑगस्ट २०२४. सकाळी ८ पासून साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग पुणे येथे ॲड.राजश्रीताई अडसूळ ( मा. स्वागताध्यक्षा, पुणे, शहर जिल्हा मातंग समाज. शहरध्यक्षा, मातंग एकता आंदोलन, महिला आघाडी ) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा मातंग समाजातील कामकाज हे आजपर्यंत निःपक्ष चालते व पहिल्यांदाच पक्षीय राजकारण केले गेले याचा जाहीर निषेध महिलांच्या वतीने करण्यात आला.
Repoter – गणेश मारुती जोशी.