हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. त्याने नवीन धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगणार आहे.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. आता सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले आहेत.
‘जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय’ असं सचिन वाझेने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी एएनआयशी बोलताना त्याने हे खळबळजनक दावे केले.
सचिन वाझे कुठल्या कुठल्या प्रकरणात आरोपी
दरम्यान अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, हायकोर्टाने सचिन वाझेबद्दल बोलताना म्हटले की, हा व्यक्तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याला दोन खूनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आताही एका खूनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवण्यासारखा हा व्यक्ती नाही असे हायकोर्टाने म्हटल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, सचिन वाझेच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले असताना त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर वाझेच्या माध्यमातून आरोप लावत आहे.
सचिन वाझे मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आहे.
100 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणात तो आरोपी आहे. त्याशिवाय 2021 मध्ये अँटिलायबाहेर बॉम्ब ठेवणं आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी केला. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिले?
सुषमा अंधारे यांनी थेट विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करतेवेळी माध्यमांशी बोलायला संधी मिळाली नाही. मग ती संधी नेमकी सचिन वाझे यांना कशी मिळते आणि वाझे यांना जर काही लिहायचं होतं, तर मग त्यांना इतका वेळ का लागला? वाझे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिले? हा देखील एक प्रश्न आहे”, असे मत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले !!!
Repoter – गणेश मारुती जोशी