हिंदजागर न्यूज, प्रतिनिधि – पुणे – सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खडकी रेंज हिल्स रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. या विभागात खरेदीसाठी वाहन घेऊन येणार्यांना खड्ड्यांमुळे अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असून, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेजार होत आहेत.
विशेष म्हणजे दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खडकी कॅन्टोन्मेंटच्या तिजोरीतून खर्च होतात, तरीही पहिल्याच पावसात दुरुस्तीचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसत आहे.
खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज न आल्याने दुचाकी, चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रक, ट्रॅव्हल्स खड्ड्यांत जोरात आदळत आहेत. परिणामी त्याचा वाहनचालकांच्या मणक्यावर परिणाम होत आहे. अनेक लहान मुले देखील ट्युशनला जाताना सायकल वरून पडले आहेत. दुचाकींचे चाक खड्ड्यात अडल्याने अपघाताच्याही घटना घडत आहेत. मागील वर्षी स्वखर्चाने या भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौं. रोहिणीताई गणेश बोरसे यांनी प्रशासन लक्ष देत नसल्याकारणाने परिसरातील मोठ-मोठे खड्डे स्वखर्चाने बुजवले होते.
विशेष म्हणजे खड्ड्यांत वाहने जोरात आदळत असल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत व या तक्रारी करायच्या कुणाकडे असा प्रश्न आता रेंजिल करांच्या मनात येत आहे???. रस्त्यांवर वाढलेल्या या खड्ड्यांचा अप्रत्यक्षपणे व्यापारावरही परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. विशेष म्हणजे हा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट रस्त्यांच्या कामाचा दर्जा कधी सुधारणार, असा प्रश्न सौ.रोहिणी ताई गणेश बोरसे ( खडकी काँग्रेस कमिटी महिला ब्लॉक अध्यक्ष ) उपस्थित केला जात आहे जर यावरती तोडगा नाही काढला तर यावर जनआंदोलन करण्याचा इशारा खडकी कॅन्टोन्मेंट यांना हिंदजागर न्यूजच्या प्रतिनिधी यांना आज प्रतिक्रिया देताना दिला आहे.
.Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी .