हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – १३ महिन्यात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. कमी अधिकारी व कर्मचारी संख्या, गावे, तीन लाख लोकसंख्येचे समावेश असलेले वाघोलीगाव. असे हे पोलीस ठाणे.हद्दीतील गुन्हेगारी रोखणे, नागरिकांचा पोलीसांबद्दल व पोलिसांचा नागरिकांबदल आदर वाढविणे. अशी आव्हाने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर आहेत.
पूर्वी ग्रामीण मध्ये असलेले लोणीकंद पोलीस ठाण्याचा २३ मार्च २०२१ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश झाला. त्यावेळी पोलीस निरीक्षक असलेले प्रताप मानकर यांना चार महिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी काम करण्याची संधी मिळाली. ते कडक शिस्तीचे अधिकारी होते. त्यानंतर गजानन पवार यांची नियुक्ती झाली. त्यांना दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली.
त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून नागरिक व पोलीस यांच्यातील संवाद उत्तम ठेवला. ते शांत स्वभावाचे होते. त्यांची बदली झाल्यानंतर कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून विश्वजित काईंगडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले होते. मात्र एका तरुणाच्या पोलीस चौकीतील आत्महत्या प्रकरणात त्यांची बसली झाली. त्यांना आठ महिने काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या बदली नंतर कैलास करे यांची नियुक्ती झाली.
मात्र त्यांनाही जास्त वेळ मिळाला नाही. चार महिन्यात त्यांचीही बदली झाली. त्यानंतर सावळाराम साळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या कामाचा ठसा दाखवण्यापूर्वीच निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार त्यांची दोन महिन्यात बदली झाली. त्यांच्या जागी पंडित रेजीतवाड यांची आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.या तरुण अधिकाऱ्यापुढे अनेक आव्हाने आहेत. दरम्यानच्या अलीकडच्या काळात एक सहायक पोलिस निरीक्षक ए सी बी च्या जाळ्यात सापडले. तर एक उपनिरीक्षक तणावातून बेपत्ता झाले होते. मात्र 24 तासात ते सुखरूप मिळाले. एका हॉटेल चालकाने पोलीस त्रास देतात म्हणून पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला.
अशा अनेक घटनांमुळे लोणीकंद पोलीस ठाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे. येथे काम करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नकार देत असल्याचे समजते. कामाचा जास्त ताण अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे. ८५ टक्के गुन्हेगारी वाघोलीत व पोलीस ठाणे लोणीकंद मध्ये अशी स्थिती आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची धावपळ होते.
स्वतंत्र वाघोली पोलीस ठाणे कधी होणार
ग्रहमंत्रालयाने वाघोली पोलीस ठाणे मंजूर केले आहे. वाघोली सध्या लोणी कंद पोलीस ठाण्यात असले तरी लोणी कंद पोलीस ठाणे हद्दीतील ८५ गुन्हेगारी वाघोलीत घडते. स्वतंत्र वाघोली पोलीस ठाण्याची गरज आहे. ते कधी होणार असा नागरिकांचा सवाल आहे.
Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी.