हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राज्यातील आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाकडून मंगळवारी (ता. १३) काढण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे तर अतिरिक्त अधीक्षकपदी सुहास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव,ठिकाण आणि बदलीचे ठिकाण-
अतुल कुलकर्णी- पोलिस अधीक्षक, धाराशिव (पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), श्रीकृष्ण कोकाटे- पदस्क्षापनेच्या प्रतीक्षेत (पोलिस अधीक्षक, हिंगोली), सुधाकर पठारे- पोलिस उपायुक्त, ठाणे (पोलिस अधीक्षक, सातारा), अनुराग जैन- पोलिस उपायुक्त, नागपूर (पोलिस अधीक्षक, वर्धा), विश्व पानसरे- पोलिस अधीक्षक सीआयडी, नागपूर (पोलिस अधीक्षक, बुलडाणा), शिरीष सरदेशपांडे- पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण (पोलिस अधीक्षक, एसीबी, पुणे), संजय जाधव- अतिरिक्त अधीक्षक, बारामती (पोलिस अधीक्षक, धाराशिव), कुमार चिंता- अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली (पोलिस अधीक्षक, यवतमाळ), आंचल दलाल- अतिरिक्त अधीक्षक, सातारा (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे गट-१), नंदकुमार ठाकूर- पदस्क्षापनेच्या प्रतीक्षेत (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र,दौंड), नीलेश तांबे- अतिरिक्त अधीक्षक, नंदुरबार (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र,नागपूर), पवन बनसोड – पोलिस अधीक्षक, यवतमाळ (पोलिस अधीक्षक सीआयडी, मुंबई), नुरूल हसन- पोलिस अधीक्षक, वर्धा (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट ११, नवी मुंबई), समीर शेख- पोलिस अधीक्षक, सातारा (पोलिस उपायुक्त, मुंबई), अमोल तांबे- पोलिस अधीक्षक, एसीबी, पुणे (दक्षता अधिकारी, पीएमआरडीए), मनीष कलवानिया- पदस्क्षापनेच्या प्रतीक्षेत (पोलिस उपायुक्त, मुंबई), अपर्णा गिते- पदस्थापनेच्या प्रतीक्षेत (कार्यकारी संचालक, सुरक्षा महावितरण). पंकज शिरसाट -अतिरिक्त अधीक्षक पालघर (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे- अतिरिक्त अधीक्षक रायगड (पोलिस उपायुक्त ठाणे शहर), रूपाली खैरमोडे अंबुरे -पोलिस उपायुक्त ठाणे शहर (पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे- कार्यकारी संचालक सुरक्षा, महावितरण (अतिरिक्त अधीक्षक पालघर), अभिजित शिवथरे- सहाय्यक महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर- पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर (पोलिस उपायुक्त, नागपूर), लक्ष्मीकांत पाटील- प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर (पोलिस अधीक्षक सायबर सुरक्षा, मुंबई), विजयकांत सागर- पोलिस उपायुक्त, नागपूर (पोलिस उपायुक्त, मुंबई), वैशाली कडूकर- प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर (अतिरिक्त अधीक्षक, सातारा), दीपाली धाटे- अतिरिक्त अधीक्षक, ठाणे ग्रामीण (पोलिस उपायुक्त, मुंबई), सूरज गुरव- पोलिस अधीक्षक, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, नांदेड), सुहास शिंदे- उपविभागीय पोलिस अधिकारी, गडचिरोली (अतिरिक्त अधीक्षक, एसीबी, पुणे).
रिपोर्ट – गणेश मारुती जोशी.