हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – दिनांक 15 ऑगस्ट रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी,जि.प.पुणे यांना घेरावकांना व जिल्हा परिषद पुणे येथे झेंडावंदन करण्यापासून रोखणार असा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी दिला होता. व त्या आंदोलनाला भ्रष्टाचारी व मजूर अधिकारी कोरगंटीवार यजाविरोधात प्रशासनाने चौकशी समितीची स्थापना करत पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश देऊन त्याला दणका दिला आहे.
मार्च 2024 महिन्यामध्ये 30 ते 40 दिव्यांग युनिक कार्ड हे कचऱ्या सापडल्या बाबतची तक्रार.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी यांनी अपंग आयुक्तालय येथे दिली होती त्यानंतर श्री.कोरगंटीवार यांनी वैयक्तिकरित्या पंचनामा करून स्वतःकडे जमा करून घेतले त्यावेळी सुद्धा आमची मागणी होती की हे पोलीस स्टेशनला पंचनामा करून जमा करा आणि गुन्हा दाखल करा प्रवीण कोरगंटीवार ( जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे ) यांनी सांगितले की पुढील 8 दिवसात गुन्हा दाखल करतो पण आज त्या गोष्टीला आठ महिने उलटून गेले पण गुन्हा दाखल झाला नाही. त्यावर दिव्यांग बांधवांना घेऊन श्री.निलेश प्रकाशशेठ ने कमी यांनी मार्च महिन्यामध्ये अपंग आयुक्तालय येथे आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या वेळेस श्री. पुरी साहेब ( दिव्यांग, आयुक्त महाराष्ट्र राज्य ) यांनी आश्वासन दिले की यात योग्य ती कारवाई केली जाईल पण कारवाई झालीच नाही .
पूजा खेडकर हिला खोटं दिव्यांग युनिक कार्ड मिळवण्यासाठी या अधिकाऱ्याने मोठा वाटा उचलला होता प्रवीण कोरगंटीवार ( जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे ) त्यांनी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करून तिला ते प्राप्त करून देण्यास मदत केली तसेच सदर दिव्यांग कार्ड तिला घरपोच सुद्धा नेऊन दिलं आहे याबाबत चौकशी समिती स्थापन करून कोरंटीवार यांच्यावरती दिवंगत नसताना अर्थपूर्ण व्यवहार करून तिला दिव्यांग युनिक कार्ड दिल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा.या मुजोर भ्रष्टाचारी अधिकारी प्रवीण कोरगंटीवार याच्यावर १) जिल्हा परिषद, पुणे , २) अपंग आयुक्तालय, पुणे जिल्हा पुणे , ३) मंत्रालय मध्ये सुद्धा अनेक लोकांनी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याबाबत तक्रारी केलेले आहेत पण कारवाई मात्र होत नाही त्याच्यावरती. पुणे जिल्हा परिषद येथे अधिकारी म्हणुन काम करणारा अधिकारी पुणे जिल्ह्य़ातील अनेक दिव्यांग शाळेतील कर्मचारी यांना पैसे मागून त्रास देत आहे. पैसे दिल्यावर च काम करत आहे अशा प्रकारची तक्रार करून कारवाई करण्यासाठी आजच्या आंदोलन करण्यात आले होते.
दिव्यांग आयुक्त व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी या मुजोर भ्रष्टाचारी अधिकाऱ्याबाबत त्वरित चौकशी समिती बसून पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन यावरती कारवाई करण्याच्या आदेश देण्यात आले आहे तसेच पुढील आठवड्यात जरी सुनावणी झाली नाही तर दिवंगत समाज कल्याणचे मंत्रांच्या घरापुढे हे आंदोलन केले जाईल असा इशारा श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी दिला आहे..
Repoter – गणेश मारुती जोशी.