हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – PCMC – रस्त्यावर पार्क केलेली वाहने फोडून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची सांगवी पोलिसांनी सोमवारी (दि. १९) मुंडण करून धिंड काढली. अक्षय राजेश खुळे (वय २७) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘मी अक्षय खुडे इथला भाई आहे,’ असे मोठमोठ्याने ओरडत शुक्रवारी (दि. १६) दुपारी दीड वाजताच्या सुमारास साठ फुटी रोड, पिंपळे गुरव येथील चार वाहनांच्या काचा फोडल्या.तसेच एका महिलेला दगड मारला. तो दगड त्या महिलेने चुकविला. जर तो दगड महिलेला लागला असता, तर तिचा जीवदेखील गेला असता. याप्रकरणी अक्षय खुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील गावगुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अक्षय खुडे याची रस्त्यावर धिंड काढली.
— गणेश मारुती जोशी..