हिंदजागर न्यूज, टीम – बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाणच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये सहभागी झालेला एक अनोखा आणि साधा व्यक्तिमत्व म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्याबद्दल विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
केदार शिंदे यांनी सांगितले की, “सूरजच्या कास्टिंगसाठी काही सदस्यांनी त्याचे नाव सुचवले. त्यावेळी त्याच्यासारखा वेगळा आणि साधा व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला घेण्याबाबत शंका व्यक्त केली होती. मात्र, आम्ही ठाम होतो कारण त्याच्यातला आपलेपणा आणि साधेपणा आम्हाला भावला. त्याच्या साधेपणामुळेच तो प्रेक्षकांच्या जवळ पोहोचला आहे.”
सूरजच्या खेळाचे अनेकांनी कौतुक केले असून तो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक बनला आहे. त्याला प्रेक्षकांसह बिग बॉसच्या पूर्वीच्या स्पर्धकांचा आणि कलाकारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या संग्राम चौगुलेने देखील टॉप 5 मध्ये सूरजला तिसरे स्थान दिले आहे, ज्यामुळे सूरजच्या खेळाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
सध्या सूरज बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन झाला आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली घर कसे चालेल, इतर स्पर्धक त्याच्या कॅप्टन्सीमध्ये कसा वावरतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरातील खेळ आता अधिक रोमांचक होत असून, सूरजची कॅप्टन्सी त्याच्यासाठी एक नवीन आव्हान असेल. दरम्यान, केदार शिंदे यांच्या या खुलाशामुळे सूरज चव्हाणची निवड कशी झाली याचा नेमका अंदाज प्रेक्षकांना आला आहे, आणि त्याच्या साधेपणाने त्याला मिळालेलं यश बघून केदार शिंदे देखील खूप आनंदी आहेत.
Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी.