हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ यांना दाखल करण्यात आले आहे.छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांना यापूर्वी 2022 मध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही अस्वस्थ वाटू लागल्याने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी अॅडमिट झाले होते. छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यावेळी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
—– गणेश मारुती जोशी