हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. घटनेचीी माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.
पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे.
ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.
Reopter – गणेश मारुती जोशी.