हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – ज्येष्ठ नागरिक नामे श्री गुलाब बोरुडे ७१ वर्ष राहणार मोरेश्वर नगर अंकुर सोसायटी डी विंग वारजे पुणे हे आज शुक्रवार दिनांक 11.10.24 रोजी 20.00 वा. चतुःशृंगी मंदिर येथे दर्शनाकरिता आलेले असताना हरवलेबाबत त्यांचा मुलगा श्री राजेश बोरुडे वय 53 यांनि चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे मदत केंद्र मध्ये तक्रार दिली. याबाबत तात्काळ CCTV फुटेज माध्यमातून शोध घेऊन तात्काळ ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांचे मुलांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी,पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, येरवडा पो ठाणे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रायगुडे, पो हवा आशिष कोळी,रवींद्र सपकाळ, पो शि शरद होणमाने, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड विशेष पोलीस अधिकारी यांनी केली आहे.
— गणेश मारुती जोशी.