हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुढच्या चार ते पाच दिवसात काँग्रेसचे चार आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे.
रविवारी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. आज राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार..
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अकोल्यातील ‘यशवंत भवन’ या आंबेडकरांच्या निवासस्थानी आमदार मिटकरी आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं, अशी साद आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. आंबेडकरांच्या काही अटीशर्ती असतील तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू असेही ते म्हणालेत. या संदर्भातच आज रात्री अजितदादांसोबत आपण स्वतः बोलणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.
पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे.. लवकरच अमरावती काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यापुढेही काँग्रेसचे तीन आमदार लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत. सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही असे मिटकरी म्हणाले.
तुतारी गटात बंपर पक्षप्रवेश सुरू आहे याबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, त्यातले लोक कंटाळलेत. ते सुद्धा पुढं अजितदादांचं नेतृत्व करताना दिसले तर नवल वाटून घेऊ नका असे मिटकरी म्हणाले. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
— गणेश मारुती जोशी..