हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये रूपाली विरुद्ध रूपाली अर्थात रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील ठोंबरे यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता.नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर तोडगा काढल्याची माहिती समोर आली असतानाच आता माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी जबाबदारी सोपवली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनंही जबाबदारी देण्यात आली आहे.
ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांना पक्षाच्या जाहीरनामा समितीमध्ये स्थान देण्यात आलंय. विशेष म्हणजे या समिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश असणार आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे या समितीचे अध्यक्ष तर आमदार शिवाजीराव गर्जे हे या समितीचे निमंत्रक असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीत कोण?
दिलीप वळसे पाटील – अध्यक्ष
धनंजय मुंडे
अनिल पाटील
नरहरी झीरवाळ
आदिती तटकरे
समीर भुजबळ
इद्रिस नायकवडी
अविनाश आदिक
रूपाली चाकणकर
वैशाली नागवडे
रूपाली पाटील ठोंबरे
सुरज चव्हाण
नजीब मुल्ला
कल्याण आखाडे
सुनील मगरे
संजय मिस्किन
आनंद परांजपे
शिवाजीराव गर्जे
— गणेश मारुती जोशी.