हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – सावित्रीबाई फुले स्मारक तसेच पुण्यात अलिशान महापौर बंगला अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सॅन होजे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणाऱ्या तसेच सर्वात प्रथम आयटी क्षेत्राला बांधकामाला २ FSI, मिळकत करत सवलत देऊन पुण्यात आयटी हब निर्माण करण्यास प्रारंभ केलेल्या माजी महापौर आणि माजी आमदार दीप्ती चवधरी यांनी शिवाजी नगर विधानसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे तर कसबा विधान सभा मतदार संघातून माजी महापौर असलेल्या कमल व्यवहारे यांनी थेट विद्यमान आमदार विरोधात शड्डू ठोकले आहेत .व्यवहारे यांनी तर मला उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करेल अशा शब्दात आव्हान दिल्याने कसब्याच्या जागेबाबत नेत्यांना विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागणार आहे.आणि मेरीट नुसार जर शिवाजी नगर मतदार संघाचा निर्णय घ्याचा असेल तर दीप्ती चवधरी यांनी केलेलं काम येथील इच्छुकांमध्ये उजवे ठरणारे असणार आहे .
पुण्यात कॉंग्रेस कसबा, कँटोंमेंट आणि शिवाजी नगर अशा तीन विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचे सांगितले जातेय. या शिवाय पर्वती आबा बागुल यांच्या साठी सोडावा असाही कॉंग्रेसचा आग्रह आहे. तर हडपसर , वडगाव शेरी , खडकवासला आणि पर्वती अशा चार मतदार संघांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा सांगितला आहे , जागा वाटप आणि उमेदवार एकाच वेळी जाहीर होतील असे चित्र आहे पुण्यातून शिवसेना ठाकरेंच्या गटाला कोथरूड मतदार संघ लढविण्यास देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान कॉंग्रेस कि राष्ट्रवादीची तुतारी हाच निर्णय पर्वतीतून कधी होणार अशा प्रतीक्षेत लांबत चालला असून त्या बरोबर कॉंग्रेसच्या निवडून येऊ शकणाऱ्या कसबा आणि कँटोंमेंट विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस अंतर्गत लाथाळ्यांना आता बळ मिळत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. अंतर्गत कुरघोड्यांच्या या रोगामुळे या दोन्ही मतदार संघातून हरयाणा सारखे निकाल आल्यास कुणाला नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे येथे उमेदवार देताना मुंबईतल्या नव्हे तर थेट दिल्लीच्या नेत्यांनी लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणून या रोगावर नियंत्रण मिळविले आणि निवडून येऊ शकणारे योग्य उमेदवार दिले तरच तरच पक्षाला येथून मिळू शकणारा विजय मिळू शकेल अशी स्थिती आहे.
—- गणेश मारुती जोशी.