हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून, भाजपने आज (दि. 20) अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
ज्यामध्ये तब्बल 99 उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आहे.
दरम्यान, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळताच सिद्धार्थ शिरोळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पक्षाचे आणि महायुतीचे आभार मानले आहे.
“आपल्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल भा.ज.पा राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाचे आणि महायुतीचे मन:पूर्वक आभार मानतो.
छत्रपती शिवाजीनगरच्या रहिवाशांचा आशीर्वाद, ऊर्जा आणि पाठिंबा, तसेच गेल्या पाच वर्षांत माझ्या कार्यसमूहाने सातत्याने केलेल्या विकास कार्याच्या जोरावर मला विश्वास आहे, की या निवडणुकीत शिवाजीनगरचे नागरिक प्रचंड बहुमताने विजय निश्चित करतील ! मी आपल्या लोकांच्या आणि देशाच्या सेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याचे आपल्याला वचन देतो. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
— गणेश मारुती जोशी.