HindJagar News – Repoter – Pune – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ मागील पंचवीस वर्षांत चार वेळा युतीला साथ देत आला आहे. तर दहा वर्षांपासून येथे भाजपचे आमदार आहेत. भाजपने तिकीट जाहीर करण्यात येथे आघाडी घेतली आहे.
विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी निष्ठावंताला, की आयाताला? अशी स्थिती काँग्रेससमोर उभी आहे. बंडखोरीला रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर राहणार आहे.
मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजय काळे विजयी झाले. त्यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपने काळे यांचा पत्ता कट करत नगरसेवक असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली. यात शिरोळे यांना 58 हजार 757 मते मिळाली.तर, काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना 53 हजार 603 आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनिल कुराडे यांना 10 हजार 454 मते मिळाली होती. चुरशीच्या या निवडणुकीमध्ये शिरोळे यांचा अवघ्या 5 हजार 124 मतांनी विजय झाला. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार नसता, तर कदाचित वेगळा निकाल लागला असता, अशी चर्चा अजूनही आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. येथे विद्यमान आमदार भाजपचे असतानाही मुरलीधर मोहोळ यांना केवळ 3 हजार 800 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे आता घटत्या मताधिक्क्यामुळे शिरोळे यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्ष महायुतीत आला आहे. त्याचा फायदा शिरोळे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघ्या महिनर राहिला आहे.
काॅंग्रेस पक्षातून अनेक जण इच्छुक
कॉंग्रेसकडून मागील वेळी निवडून लढलेले माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यासह माजी आमदार दीप्ती चवधरी, आणि आणखी काही जण या वेळी येथूल इच्छुक आहेत. लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांचे काम करणारे माजी नगरसेवक सनी निम्हण आता काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र, त्यांना मूळ कॉंगेसचे असलेल्या इच्छुकांनी कडाडून विरोध केल्याचे समजते. “आमच्या पैकी एकाला उमेदवारी द्या आम्ही त्याचे काम करू,’ अशी त्यांची भूमिका आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
मतदारसंघातील समस्या आणि संमिश्र लोकवस्तीचा परिसर
वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमणे, झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या समस्यांना शिवाजीनगर येथील नागरिकांना वारंवार समोरे जावे जागत आहे. तसेच काही भागांत अस्वच्छता, सार्वजनिक वाहतूक हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत.शिवाजीनगर मतदारसंघात उच्चभ्रू, मध्यमर्गीय आणि वस्ती असा संमिश्र आहे. शिवाजीनगर, गोखलेनगर, वडारवाडी, खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड, बोपोडी हा झोपडपट्टी आणि मध्यमर्गीय वस्तीचा भाग आहे. हा वर्ग परंपरागत काँग्रेसचा पाठीराखा आहे. तर औंध, भोसलेनगर, मॉडर्न कॉलनी, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायट्यांचा भाग आहे. यातील उच्चभ्रू वर्ग गेली अनेक वर्षे भाजपचा मतदार राहिला आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार : २ लाख ९१ हजार ६
पुरुष मतदार : 1 लाख 46 हजार 635
महिला मतदार : 1लाख 44 हजार 325
तृतीयपंथी : 46
— Ganesh Maruti Joshi