HindJagarnews – Repoter – Pune – ‘पोर्शे प्रकरणात करायला गेले एक अन झाले एक ‘ यामुळे आमदार बॅकफुटवर गेलेले दिसताच त्या संधीचा फायदा जरी भाजपने घेतला आणि मुळीकांना उमेदवारी दिली तरी मुळीकांना तर आपण लीलया लोळवू असे विधान शरद पवार गटाचे बापू पठारे यांनी केले आहे.
दरम्यान टिंगरे कि मुळीक या वादातच अडकून राहिलेल्या वडगावशेरी मतदार संघात महायुतीला आता फारच कमी अवधी मिळणार असल्याचे दिसते आहे जो त्यांच्या विजया पर्यंत पोहोचण्यास धोकादायी ठरणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वडगावशेरी मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती मधील भारतिय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन प्रमुख पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 99 जणांना उमेदवारी जाहीर केली, मात्र या यादीत पुण्यातील तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे नाहीत, यामुळे या तीनही मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच वडगाव शेरीच्या जागेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे या मतदारसंघात सस्पेन्स वाढला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान आमद़ार सुनील टिंगरे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा प्रवेश झाला आहे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र शिवसेना ठाकरे गट या जागेबाबत आग्रही आहे. महायुती कडून इच्छुक असलेले आजी – माजी आमदार आपल्या मतांवर ठाम असल्याने मुळीक जर रिंगणात उतरले तरी शरद पवारांच्या बापू पठारेंना निवडणूक अवघड जाणारी नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याचे संकेत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचे टिंगरे सांगत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून आपली उमेदवारी पक्की असल्याचे मुळीक सांगत आहेत. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना ए, बी फॉर्म दिल्याची चर्चा सोमवारी रंगली असली तरी अधिकृत उमेदवार यादी राष्ट्रवादी कडून जाहीर झालेली नाही. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ महायुती मध्ये नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेला याचा सस्पेन्स कायम आहे.
— Ganesh Maruti Joshi.