HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच पक्षांनी उमेदवार यादांचा सपाटा लावला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीमध्ये पुण्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये खडकवासला, पर्वती, पिंपरी आणि जुन्नर मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. अद्याप चिंचवड मतदारसंघाचा उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही.
खडकवासल्यातून सचिन दोडकेंना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सचिन दोडके यांना शनिवारी एबी फॉर्मही देण्यात आला आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात गेल्यावेळी सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता, यावेळी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र या मतदारसंघात इच्छुक असलेले नेते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
तर दुसरीकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विचार केलास हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही होता. काँग्रेसकडून(Congress) या विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते आबा बागुल हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. ,मात्र अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आबा बागुल हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.त्यामुळे आगामी काळामध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जुन्नर विधानसभेत काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर महायुतीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना संधी देण्यात आली आहे. सत्यशील शेरकर यांचा अतुल बेनके यांच्या विरोधात सामना होणार आहे.
—– Ganesh Maruti Joshi.