HindJagar News – Repoter – News – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी २२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने दुसऱ्या यादीत मुंबईच्या एकही मतदारसंघाचं नाव नाही. भाजपने पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना संधी दिली आहे. हेमंत रासने यांनी रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.
नाशिकमधील देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधून विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सोलापूरमधील राम सातपुते यांचं नाव दुसऱ्या यादीत देखील नाही. तर महायुतीत वाद असलेल्या आष्टी मतदारसंघाचा देखील या यादीत समावेश नाही.
भाजपने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. पेणमधून रवींद्र पाटील(रवीशेठ पाटील) यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. पेणमध्ये रवींद्र पाटील यांचा मुलगा लढणार अशी चर्चा सुरु होती.
विक्रमगडमधे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे विक्रमगडची जागा अजित पवार गटाकडे जाईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, विक्रमगडची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. विक्रमगड बदल्यात अजित पवार यांच्या पक्षाला कोणती जागा मिळते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तर वाशिम , गडचिरोली येथील विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर आता नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे 1. पुणे छावणी – सुनील कांबळे 2. कसबा – हेमंत रासने 3. लातूर ग्रामीण – रमेश कराड ‘ 4. उल्हासनगर – कुमार आयलानी 5. शिराळा – सत्यजित देशमुख 6. धुळे ग्रामीण – राम भदाणे 7. मलकापूर – चैनसुख संचेती 8. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल 9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे 10. वाशिम – श्याम खोडे 11. खडकवासला – भीमराव तापकीर 12. जत – गोपीचंद पडळकर 13. अकोट – प्रकाश भारसाखले 14. मेलघाट – केवलराम काळे 15. नाशिक मध्य – देवयानी फरांदे 16. पंढरपूर – समाधान आवताडे 17. वरोरा – करण देवतळे 18. विक्रमगड – हरिश्चंद्र भोये 19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे 20. राजुरा – देवराव भोंगळे 21. गडचिरोली – मिलिंद नरोटे 22. पेन – रवींद्र पाटील
—– Ganesh Maruti Joshi.