HindJagar News – Repoter – News – भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीनाट्य सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातही भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.हेमंत रासने यांच्या उमेदवारीवरून पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज झाले आहेत. धीरज घाटे यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्यातून भाजपने तीनही जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण तीस वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नको, अशी धीरज घाटे यांनी फेसबुक पोस्ट नाराजी व्यक्त केली आहे. धीरज घाटे कसबा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते.
भाजपकडून पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील सहा मतदारसंघात भाजपने उमेदवार घोषित केले आहे. कसबा मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना संधी मिळाली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात केलेली विकासकामे आणि संघटना बांधणीमुळे रासनेंच्या नावाला पसंती होती. भाजपच्या सर्व सर्व्हेत हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिलं. त्यानंतर अखेर भाजपने उमेदवारीची मोहोर लावली. शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक कसब्यातून इच्छुक होते. परंतु भाजपने रासने यांच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
पुण्यात नवीन चेहऱ्यांना संधी नाही
पुण्यातील सर्व विद्यमान आमदारांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केले आहेत. पुण्यातील एकाही नवीन चेहऱ्याला भाजपकडून संधी मिळाली नाही.
—– Ganesh Maruti Joshi.