HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी जाहीर केलेल्या नावात बदल केला आहे.याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अंधेरी पश्चिम येथे आधी काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे आता काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. वरोरामधून प्रवीण काकडे यांना तिकिट जाहीर केले आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या उमेदवारांना मिळाली संधी
१.अमळनेर : डॉ.अनिल शिंदे
२. उमरेड – अनुसूचित जाती: संजय नारायणराव मेश्राम
३. आरमोरी – एसटी : रामदास मसराम
४. चंद्रपूर – अनुसूचित जाती: प्रवीण नानाजी पाडवेकर
५. बल्लारपूर : संतोषसिंग चंदनसिंग रावत
६. वरोरा : प्रवीण सुरेश काकडे
७. नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
८. औरंगाबाद पूर्व : लहू एच. शेवाळे
९. नालासोपारा : संदीप पांडे
१०. अंधेरी : अशोक जाधव पश्चिम
११. छत्रपती शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट
१२. पुणे कॅन्टोन्मेंट – अनुसूचित जाती: रमेश आनंदराव भागवे
१३. सोलापूर दक्षिण : दिलीप ब्रह्मदेव माने
१४. पंढरपूर : भगीरथ भालके
——- Ganesh Maruti Joshi.