HindJagar News – Repoter – NEWS – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आहेत.या जागेसाठी अमोल बालवडकर हे इच्छूक होते. मात्र, त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले. परंतु, हे प्रयत्न अपयशी ठरले. कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि भाजपसाठी सेफ मतदारसंघ समजला जातो.यावेळी चंद्रकांत पाटील यांना पक्षांतर्गत विरोधाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते अमोल बालवडकर यांनी अपक्ष लढण्यास पसंती दिली आहे . याचे कारण म्हणजे बाणेर- बालेवाडीच्या उच्छभ्रु सोसायटी भागात त्यांचे चांगले काम आहे. नगरसेवक म्हणून त्यांचा संपर्क आहे. त्यांनी आपली नाराजी पक्षाबद्दल नसून चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपध्दतीवर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजप विचारांचा मतदारही त्यांना पाठिंबा देऊ शकतो. कोथरुडमध्ये आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील मतदार संख्या चार लाख आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहिला तर पन्नास टक्केंपेक्षा जास्त मतदान होत नाही. त्यामुळे सुमारे दोन ते सव्वा दोन लाख मतदान होईल. त्यातील सत्तर हजार मतेही विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी ठरतील. इतकी मते घेण्याची बालवाडकर यांची क्षमता आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार चंद्रकांतदादांसमोर चिंता आहे.
मात्र आता याच मतदार संघात अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. कोथरुडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजप कदम चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे आणि आता अमोल बालवडकर हे चौघे कोथरुड काबीज करण्यासाठी नशीब आजमावणार आहेत.थेट बालवडकर यांच्याशी चंद्रकांतदादा यांचा सामना होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही .
—- Ganesh Maruti Joshi.