HindJagar News – Repoter – Pune – कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी भाजप नेते अमोल बालवडकर इच्छुक होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील घरोघरी ते पोहोचले होते.
आज अखेर चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवत बालवडकर यांची समजूत काढली आहे. कोथरूड विधानसभेसाठी अमोल बालवडकर इच्छुक होते. पण भाजपकडून मागील प्रमाणे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमोल बालवडकर नाराज होते.पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अगदी सरक्षित आणि बालेकिल्लाच समजला जातो. पण अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे याठिकाणी मतांचे विभाजन होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आले. पण चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे. त्यामुळे कोल्हापूर सोडून त्यांनी पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढवल्यामुळे याठिकाणी स्थानिक विरूद्ध आयात उमेदवार या मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरत राहिली. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी त्याठिकाणी नाराजीही व्यक्त केली. पण चंद्रकांत पाटील यांची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टर्मलाही कोथरूडकर आयात चंद्रकांत पाटील यांना स्वीकारतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
2008 मध्ये शिवाजनगर विघानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि कोथरूड हा नवा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे याठिकाणी निवडून आले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी या निवडून आल्या.त्यांनी शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला. 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर मेधा कुलकर्णी यांना मात्र तिकीट नाकारण्यात आले. पण त्यामुळे मेधा कुलकर्णीही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर भाजपने त्यांना राज्य सभेत पाठवून त्यांचंही पुर्नवसन केलं.याठिकाणी महायुतीतच बंडखोरीचे सूर उमटू लागले आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी माघार घेतली नाही, तर या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता होती.
अमोल बालवडकरांनी दंड थोपटल्यास चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरणार त्यांनी बंडखोरीचा इशारा देताच प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन अमोल बालवडकर यांची समजूत काढली . हे प्रयत्न यशस्वी ठरले.दरम्यान आता बालवडकर यांनी विधानसभेतून माघार घेतली असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
—- Ganesh Maruti Joshi.