HindJagar News – Repoter – Pune – शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तिघांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत.
पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्यात तीन जणांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणूक आणि सणासुदीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर..
राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पुण्यातही निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यात ऐन दिवाळीसारखा मोठा सण आहे. याचदरम्यान, पुण्यात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात रात्री अंधारात तिघांनी गोळीबार केला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
——— Ganesh Maruti Joshi.