HindJagar News – Repoter – PUNE – पथारी व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी नव्हे, तर सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना या विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वखुशीने पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा शिवाजीनगर पथविक्रेता एकता समितीचे अध्यक्ष दीपक मोहिते यांनी केली.
शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत मोहिते यांनी समितीच्या वतीने शिरोळे यांना आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
पथविक्रेता समितीचे पाच हजारांहून अधिक सभासद आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कमला नेहरू उद्यानालगतची खाऊ गल्ली, झेड ब्रीजजवळ नटराज खाऊ गल्ली, संभाजी उद्यानालगतची खाऊ गल्ली येथे खाद्यपदार्थ विक्री केली जाते. हे फूड झोन आहेत. येथील व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न शिरोळे यांनी सोडवले. त्यामुळे आता सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांवरील कारवाई होत नाही. यामुळेच पक्ष न पाहता उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शिरोळे यांना पाठिंबा देत आहोत, असे मोहिते यांनी सांगितले.यावेळी समितीचे उपाध्यक्ष सुनील भादेकर, समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी निवडणुकीसाठी पाठिंबा आणि समर्थनाचे औपचारिक पत्र शिरोळे यांना सुपूर्द केले. यावेळी प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपूर्व खाडे, महायुतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
महापालिकेचे अधिकारी अचानक येऊन सिलिंडरवर कारवाई करतात, सिलिंडर उचलून घेऊन जातात. अगदी गर्दीच्या वेळेस व्यवसाय बुडतो आणि मोठे नुकसान होते. शिरोळे यांनी हस्तक्षेपामुळे परिस्थिती बदलली आहे. अशा अचानक कारवाईची चिंता दूर झाली असल्याचेही मोहिते म्हणाले.
मतदारसंघात प्रचारफेरी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने शिरोळे सध्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आजही खिलारेवाडी म्हसोबा मंदिर, प्रभात रस्ता, डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन बसस्थानक, कमला नेहरू पार्क, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, पुलाची वाडी या भागांत पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या.
——– Ganesh Maruti Joshi.