HindJagar News – Repoter – PUNE – आजच्या महाराष्ट्रासमोरचीसर्वात गंभीर समस्या कोणती? अर्थव्यवस्थेची स्थिती आणि वाढती कर्जे, कायदा-सुव्यवस्थेचा अभाव, अन्य राज्यांकडून वाढती स्पर्धा, खेळासकट अन्य अनेक क्षेत्रांत होणारी महाराष्ट्राची पीछेहाट, शहरांचे बकालीकरण… हे सर्व वा आणखी काही मुद्दे समस्या ठरत नाहीत; असे नाही.या समस्या आहेतच. पण या सर्व समस्यांचे मूळ आहे ते महाराष्ट्राचे अत्यंत वेगाने होणारे अंतर्गत विलगीकरण. या राज्याचे झपाट्याने होत चाललेले कप्पे. हे कप्पे आर्थिक तर आहेतच. पण आर्थिक कप्पे कायम असतातच आणि काही अंशी असणारच. पण आजच्या महाराष्ट्रासमोरचे खरे आव्हान आहे ते वाढता सामाजिक दुभंग; हे. कसे; ते समजून घेणे आवश्यक आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच उमेदवार विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढत आहेत.
छत्रपती शिवाजी नगर येथे अपक्ष उमेदवार अजय शिंदे अपक्ष उमेदवारानी पिपाणी चिन्हाचीच मागणी केली होती.शिंदे यांचा पाषाण, N.C.L COLONY, खैरेवाडी, वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी , वडारवाडी येथे दांडगा जनसंपर्क असल्यामुळे काँग्रेसला पराभवाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना किंवा फटका बसणार ? अशी भीती यानंतर व्यक्त होतेय.तरी अजय शिंदे हे नाव ऐन निवडणुकीत धुमाकूळ घालू शकतं…
अपक्ष उमेदवार अजय शिंदे यांना याबाबत विचारलं असता, मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढवत असून लवकरच भेटून प्रतिक्रिया देऊ असं ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजीनगर येथे काँग्रेसला पुन्हा मोठया प्रमाणात फटका बसणार अशी चर्चा रंगली आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीत ही जागा भाजपला सुटली असली आहे व त्यांना याबाबत कुठल्याही प्रकारची हिंता नाही.. मतदारसंघात कोण गेम चेंजर ठरू शकतो याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे!!!
प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस मध्येच मोठी लढाई आहे पण या सगळ्या सीनमध्ये अजय शिंदे त्यांच्या भागांमधून प्रभावी राहतील.
मराठा मतदारांचा प्रभाव
अजय शिंदे यांनी निवडणुकीची तयारी 2 वर्ष आधीच सुरू केली आहे. यंदा छत्रपती शिवाजी नगर विधान सभा निवडणुकीचे समीकरण आणखी जटील होऊ शकते ??? अजय शिंदे यांचा तरुण पिढीवर प्रभाव आहे, आणि मराठा समाजाच्या मतांचा कल जर शिंदे यांच्याकडे झुकला, तर सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट अशी तिरंगी लढत होऊ शटते. यात मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.
मागील विधान सभेला निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या रूपात अनिल कुऱ्हाडे यांचा फॅक्टर दिसून आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत अजय शिंदे फॅक्टरचा फटका कोणाला बसणार ????
—– Ganesh Maruti Joshi.