HindJagar News – Repoter – PUNE – पतंप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज दुसरा दौरा होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूरातील सभेतूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला.त्यानंतर, पुण्य नगरी असलेल्या पुणे शहरातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम 370 वरुन काँग्रेसवर निशाणा साधला. पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची सभा होत असताना एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असताना व्हीव्हीआयपी रांगेतच काहीप्रमाणत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा कार्यकर्ता उठला आणि एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आयटी हब अन् शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याला येत्या काळात देशातील पहिले “कनेक्टीव्हीटी” शहर बनवणार असल्याचे सांगत त्यांनी पुण्याच्या जनतेचे आभार देखील मानले. पुणे व भाजपचे नाते वेगळे आहे. पुण्याने नेहमी भाजप विचारांचे समर्थन केलेले आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिंमतीने लढली आहे. त्यामुळे, राज्यभरातील मराठा एकटवला असून मराठा आरक्षणासाठी आपलं योगदान देत आहे. त्यातूनच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मराठा बांधवाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्यापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आयटी हब अन् शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याला येत्या काळात देशातील पहिले “कनेक्टीव्हीटी” शहर बनवणार असल्याचे सांगत त्यांनी पुण्याच्या जनतेचे आभार देखील मानले. पुणे व भाजपचे नाते वेगळे आहे. पुण्याने नेहमी भाजप विचारांचे समर्थन केलेले आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुद्द्यावरुन लक्ष वेधले. मराठा आरक्षण भेटलच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जॅकीट घातलेला हा कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती. विशेष म्हणजे पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी होती, आणि हा कार्यकर्ता व्हीव्हीआयपी रांगेत बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अखेर पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत करुन सभास्थळावरुन दूर नेले. मात्र, या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाच वातावरण निर्माण झाल होतं.
पुण्यासाठी महायुती सरकारने केली विकासकामं
पुढे ते म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक व आयटी क्षेत्रात ही गुंतवणूक झाली आहे. कंपन्यांची संख्या वाढली आहे. या ‘स्टार्ट अप’चा युवकांना फायदा झाला असून, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाहन उद्योग हा नेहमी अग्रेसर राहिला आहे. येथील गुंतवणुकीमुळे नवीन संधीची दारे उघडली आहेत. शहराला याद्वारे सर्व सुविधा, उद्योग, साधने देऊन कनेक्टीव्हीटी करीता महायुती काम करत आहे.
तुमच्या आकांक्षा मला आदेश देतात. तुमचे स्वप्न हे दिवस-रात्र काम करण्यासाठी माझ्यासाठी प्रेरणा आहे. तुमचे जीवन सुकर असावे ही प्राथमिकता आहे, त्यासाठी पुण्यात मेट्रोचा विस्तार केला जात आहे. त्यासोबतच पुण्याच्या रिंगरोडसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, खोपोली खंडाळा मिसींग लिंकसाठी साडे सहा हजार तर बाह्य वर्तुळाकार रस्त्यांसाठी साडे दहा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आज एकादशी आहे. एकादशी म्हंटल्यानंतर पालखी सोहळा आठवतो, त्यासाठी या पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वारकऱ्यांसाठी हा मार्ग पालखी मार्गाचे म्हणजे, ही समर्पित सेवा आहे” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील भाषणामध्ये व्यक्त केले.
अमित शाह यांची मुंबईत सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील उमेदवारांसाठी पुण्यात सभा घेतली तर, गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत सभा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शाह यांची आज मुंबईतील दुसरी सभा बोरीवलीत पार पडली. सप्ताह मैदानातून गृहमंत्री अमित शाहांनी जाहीर सभेला संबोधित केले. उत्तर मुंबईतील सहा उमेदवारांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदिवलीचे उमेदवार अतुल भातखळकर, मालाड पश्चिमचे उमेदवार विनोद शेलार, चारकोपचे उमेदवार योगेश सागर, बोरीवलीचे उमेदवार संजय उपाध्याय, मागाठाण्याचे उमेदवार प्रकाश सुर्वे, दहिसरच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्यासाठी अमित शाह यांची सभा पार पडली.
येणारी पाच वर्ष हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारी
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यात आले होते. त्यांनी पुण्याच्या स. प महाविद्यालयाच्या मैदानातून पुणेकरांशी सवांध साधला. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते, उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, पुणे आणि भाजप यांच्यातील नाते नेहमी भाजपच्या विचारांचे समर्थन करणारे राहिले आहे. “पुण्यातील जनतेचे मी आभार मानतो. महायुतीचे सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी जोरात काम करणार आहे. येणारे पाच वर्ष हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारे असेल.
पुण्यातील नागरिकांना सशक्त करण्यासाठी शहरात गुंतवणुकीसोबतच त्यांना पायाभुत सुविधा, औद्योगिकरण केले जाईल. त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीवर काम केले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली असून, त्यात पुण्यात मोठी गुंतवणुक होत आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
——– गणेश मारुती जोशी.