HindJagar News – Repoter – PUNE – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय बाळगून गेल्या पाच वर्षांत मनापासून काम केले. औंध, मॉडेल कॉलनी, बोपोडी अशा विविध भागांतील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दिशेने भरीव प्रयत्न केले आणि विकासकामांना गती दिली.अशी भावना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.
औंध भागात स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कुटीर रुग्णालयात सोयीसुविधा, जगदीशनगर सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत येथे हायमास्ट दिवे, बॉडी गेट पोलिस लाईन, इंदिरा वसाहत येथे विद्युत तारा भूमिगत करणे, औंध गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण, सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीची कामे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळे मतदार संघात सर्वत्र मतदारांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी औंध येथील प्रिसम सोसायटी, वेस्टर्न रिव्हर व्ह्यू सोसायटी, सेल्वेन हाईटस सोसायटी, निर्मिती होरिझोन सोसायटी यासोबतच दीप बंगला चौक, मित्र नगर कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक स्मारक, मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटरची दुरुस्ती, भोसलेनगर येथे महावितरणचे रिंग मेन युनिट बसविणे, नॉव्हेल्टी हेरिटेज को-ऑप. हौसिंग सोसायटी येथे भूमिगत केबल टाकणे, ही कामेही मार्गी मागील पाच वर्षांत मार्गी लागले आहेत. तसेच गणेश सोसायटी, खाऊ गल्ली लेन, हर्डीकर हॉस्पिटल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आनंद यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी येथील लकाकी तळे रोड व अन्य भागात ड्रेनेज लाईन टाकल्या असून या भागातील नागरिकांचे जीवन आणखी सुखकर करण्यासाठी आणखी खूप काही करायचे असल्याचेही शिरोळे म्हणाले.या परिसरासाठी येत्या काळात शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांसाठी खुली करणे व इतर मैदाने सुसज्ज करणे, मेट्रो स्थानकांपर्यंत येण्या-जाण्यासाठी फीडर बस आणि रिक्षासेवेची उपलब्धता, मॉडेल कॉलनी, औंध येथील ‘पीएमपीएल’च्या बसथांब्यांचे नूतनीकरण, औंध आयटीआयचे अद्ययावतीकरण, युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे, ओपन जिम, जलतरण तलाव, तसेच मॉडेल कॉलनीमध्ये ‘एमएनजीएल’चे नेटवर्क पूर्ण करणे, ही कामे प्रस्तावित असून लवकरात लवकर ती पूर्ण होतील असे आश्वासन शिरोळे यांनी दिले.
——– GANESH MARUTI JOSHI.