HindJagar News – Repoter – PUNE – महाराष्ट्र जोशी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधानसभा निवडणुकी संदर्भात महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष निलेश प्रकाशशेठ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.महाराष्ट्र जोशी समाज संघटना याच्या वतीने आज छत्रपती विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवारची सिद्धार्थ दादा शिरोळे यांना यांना पाठिंबा देण्यात आला आहे.पुढील काही दिवसांमध्ये समाजाच्या वतीने अजून काही लोकांना पाठिंबा देण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्याबाबत माध्यमांना कळविण्यात येईल असे संघटनेचे गणेश मारुती जोशी राष्ट्रीय प्रवक्ते यांनी सांगितले.
जोशी समाजा भटका विमुक्त मध्ये मोडला जातो नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने समाज बांधवांचे 50000 मोफत जातीचे दाखले करून देण्याचा मानस केला होता पण अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते काम पूर्ण होत नव्हतं त्यावेळेस तील विद्यमान आमदार श्री.सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या पुढाकाराने मा. नामदार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आमदार श्री.सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये संघटनेच्या शिस्त मंडळाची बैठक करून देऊन तो प्रश्न मार्गी लावला तसेच भविष्यात जोशी समाजासाठी आर्थिक महाविकास मंडळ स्थापन करण्याबाबतची व समाजातील लोकांना प्रस्थापित करण्याचे मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निलेश प्रकाशशेठ निकम मागणी पाठिंबा देताना करण्यात आली आहे.
रविवारी जोशी समाज संघटने मार्फत गोखले नगर भागामध्ये मेळावाचा आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती – दिव्या दिनेश जाधव ( पुणे शहर महिला, अध्यक्ष ) यांनी दिली .
महाराष्ट्र कार्यकारणीतले श्री. संदीप निकम , श्री.गणेश मारुती जोशी , श्री.सुजित मनोहर हांडे , श्री. तानाजी सुर्वे , श्री. रामदास निकम , श्री.औदुंबर सूर्यवंशी , श्री.महेश हेंद्रे श्री.मनोहर तात्या शिंदे, श्री.मल्हारी जोशी श्री. दगडू जोशी, श्री. ओंकार परदेशी ,श्री.भाऊसाहेब कारंडे, सौ.शुभांगी उर्फ सीमा महेश हेंद्रे, कु. दिव्या जाधव , सौ. सुरेखा निकम, व श्री.रोहित किशोर निकम , श्री.रविराज गंगावणे, श्री कुणाल हेंद्रे, श्री.कोंडीबा पवार , श्री. संतोष जोशी व मोठ्या प्रमाणात जोशी समाज संघटनेचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.
——– VINOD WAGMARE…