HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाची आकडेवारी आता समोर आली आहे. याठिकाणी भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत. त्यांनी सात फेऱ्यांमध्ये आपली आघडी कायम ठेवली आहे. त्यांनी सातव्या फेरीत 13643 मतांची आघाडी घेतली आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाची चार फेऱ्यांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा आघाडीवरच असल्याचे दिसून येत आहे. सिद्धार्थ शिरोळे हे सध्या ५ हजारच्या जास्त मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सिद्धार्थ शिरोळे यांना 5 हजार 340 मतांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या दोन फेरी अखेरच्या आकडेवारीनुसार शिरोळे हे 3 हजार 858 मतांनी आघाडीवर होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दत्त बहिरट आणि अपक्ष मनीष आनंद उभे आहेत.
Author – Ganesh Maruti Joshi.