HindJagar News – Repoter – PUNE – विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं आहे. आता 23 नोव्हेंबरला जनता कुणाला कौल देणार याचा फैसला होईल. पण त्याआधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावून लढले.’सु-संस्कृत महाराष्ट्रासाठी सत्ता आपल्या हातात द्या’ अशी हाकही त्यांनी दिली. पण एक्झिट पोलमध्ये मनसेला फारस यश मिळालं नाही.
पाचही एक्झिट पोलमध्ये इतरांना जास्ती जास्त २९ जागा दिल्या आहे. तर कमीत कमी या 8 जागा दिल्या आहेत. मनसेची इतर पक्षामध्येच नोंद असते. त्यामुळे मनसेला या पाचही पोलमध्ये कमी जागा दाखवल्या आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरेंनी विधानसभेत महाराष्ट्रभर प्रचारसभा घेतल्या. प्रत्येक सभेत त्यांनी ठाकरे आणि पवारांवर टीकेची एकही संधी सोडली नाही. तर दुसरीकडे, आपला मुलगा अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे 8 ते 29 जागांमध्ये मनसेच्या वाट्याला किती जागा येतील हे पाहण्याचं ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा महाटप्पा संपला आहे. 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडलंय. एकूण 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. 9 कोटींनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रावर शांतेत मतदान पार पडलं आहे. बीडमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र उर्वरीत महाराष्ट्रात शांततेत मतदान पार पडलं असून 5 वाजेपर्यंत 58. 22 टक्के मतदान झालं आहे.गडचिरोलीत सर्वाधिक 69 तर ठाण्यात सर्वात कमी 49 टक्के मतदान झालं आहे.यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच विधासभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी निवडणुक लढवत आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक धनुष्यबाण चिन्हाविना लढले आहे तर शरद पवार घड्याळ्याशिवाय. पक्षापक्षांतली लढाई, नेत्यानेत्यंमधली लढाई, नात्यागोत्यातली लढाई या निवडणुकीत सर्वात चर्चात राहिली. ही निवडणूक एकप्रकारे ठरवेल की खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, राज्यात सत्ता कुणाची.
लाडकी बहिण, बटेंगे तो कटेंगे, सोयाबीन कपाशीचा हमीभाव, पॉलिटिकल नेपोटिझम सारख्या मुद्द्यांनी विधानसभेची निवडणूक गाजवली. या निवडणुकीत कुणाची होणार जीत, कुणाची होणार हार, कोण असेल आघाडीवर, कोण असेल पिछाडीवर याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रासह देशाला लागून आहे. आता 23 तारखेला महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कुणाला, याचा फैसला होईल.
Author – Ganesh Maruti Joshi.