पुणे प्रतिनिधी – पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील (Pune University Bridge) बहुमजली उड्डाणपुलाचं काम जोमात सुरु आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत होणार कामाची पूर्तता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विद्यापीठ चौकात फ्लाय ओव्हर आणि त्यावरुन मेट्रो धावणार आहे. पुण्यातील विद्यापीठ चौकात चार मजली उड्डाणपूल बनणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असल्याचा दावा पीएमआरडीए आणि पुणे पालिकेकडून करण्यात आला आहे.मागील काही वर्ष अनेक कारणांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं. पूल नसल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र पुलाचं काम सुरु झाल्याने पुणेकरांची येत्या काही वर्षात वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. पुलाचं काम सुरु झाल्याने सध्या मात्र मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार
पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची माहिती आहे. पीएमआरडीए आणि पुणे महापालिका अधिकारी एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या सगळ्याचं प्लॅनिंग किंवा मार्ग नेमका कसा असेल यासाठी त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करुन माहिती दिली होती. विद्यापीठ चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते मिळत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गेले अनेक दिवस ही वाहतूक कोंडी फुटावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावर आता तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पीएमआरडीएकडून थेट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यात नियोजन कसं असेल यासंर्भात सगळी माहिती देण्यात आली होती.
अपेक्षित काम आणि सौंदर्यीकरण पूर्ण होण्यासाठी आता एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल. चौकाचौकातील बांधकाम लवकरात लवकर करून जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. सुरक्षा बॅरिकेड्स आणि पर्यायी मार्गांच्या परवानग्या असल्यास नोव्हेंबर 2024 ची उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊ शकतं, असंदेखील सांगण्यात आलं .
लवकरात लवकरत काम पूर्ण करा…
हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या काही परिसरात आणि IT हब दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांसाठी गणेशखिंड रस्ता हा मुख्य मार्ग आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी झाली असून, हे काम प्राधान्याने हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आमदार सिद्धार्थ ओले यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
- श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )