हिंदजागर प्रतिनिधी – चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन – सायबर व आर्थिक गुन्हे शाखा पुणे- एपीएस वेल्थ व्हेंचर्सचा संचालक अविनाश राठोड आणि विशाखा राठोडवर 16 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला.
गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 16 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या संचालकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 2018 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे. याबाबत वाकड येथील एका डॉक्टरने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
डॉ. जयदीप शंकरराव जाधव (वय-50 रा. कस्पटे वस्ती रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्श एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड , त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा.आनंदबन सोसायटी, रावेत) व इतर साथिदारांवर आयपीसी 420, 406, 409, 34 सह एमपीआयडी कायद्यांतर्गत (MPID Act) गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांना एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स एलएलपी या कंपनी गुंतवणुक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्य़ादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवला. फिर्य़ादी यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून 1 कोटी 20 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या स्किममध्ये गुंतवले. गुंतवणूक केलल्या रक्कमेवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तसेच करार करुन दिला.आरोपींनी फिर्यादी यांनी गुंतवलेल्या पैशांवर परतावा न देता आर्थिक फसवणूक केली अशी माहिती श्री.बालाजी पांढरे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन ) यांनी दिली
फिर्यादी यांनी गुंतवलेल्या रक्कमेपैकी 86 लाख 37 हजार 500 रुपये व इतरअनेक गुंतवणूकदारांचे 15 कोटी 45 लाख 24 हजार अशी एकूण 16 कोटी 31 लाख 61 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.आरोपींनी कराराचा भंग करुन गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील परतावा न देता पैशांचा अपहार करुन अनेकांची फसवणूक केली.तसेच अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचा अंदाज वर्तवला जात असून याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असू शकते.आरोपींनी कोट्यावधी रुपायांची फसवणूक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )