हिंदजागर प्रतिनिधी – पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटली. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्री म्हणजेच, २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याची घटना घडली आहे. तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्यानंतर प्रवाशामध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये अंदाजे 50 ते 60 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरू केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली होती. ढाब्यात जेवण केल्यानंतर सर्व बसमध्ये परतले. त्यानंतर बस दुसऱ्याने चालवायला घेतली. बस खूप वेगात होती. मुंबईहून तेलंगणाला जाणारी भरधाव वेगातील ही बस उलटली. भरधाव बस प्रवाशांनी गच्च भरली होती. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवासी घटनास्थळी आहेत’.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )