हिंदजागर प्रतिनिधी – पुण्यातील खडकीमध्ये महिलेवर चाकूने हल्ला करुन खून केल्याप्रकणी आरोपींना कर्नाटकातील विजापूरमध्ये अटक करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून आरोपी रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने महिलेची हत्या केली होती. खडकी पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी नसिर बिराजदार आणि त्याच्या साथीदाराला विजापूरमधून अटक केली.खडकीतील लष्कराच्या दारुगोळा कारखान्याजवळ महिलेची भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. आरोपींनी महिल्या गळ्यावर चाकून वार कर तिचा खून केला होता. रजनी राजेश बकेल्लू (वय 44 वर्षे, रा. कुंदन कुशलनगर सोसायटी, बोपोडी) असं या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला दारुगोळा कारखान्यात (ॲम्युनिशन फॅक्टरी) कामाला होती.
एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूने हल्ला …
आरोपी नसिर बिराजदार हा रिक्षाचालक असून मृत महिलेची आणि त्याची दोन वर्षांपासून ओळख होती. कामाची ये-जा करण्यासाठी त्यांनी रिक्षा लावली होती. आरोपी तिला आपल्या रिक्षातून रोज कामावर सोडत असे. त्यातूनच आरोपी नसिरचे महिलेवर एकतर्फी प्रेम जडलं. परंतु महिलेना त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही. हाच राग मनात ठेवून नसिरने तिला मारण्याचा कट रचला. साथीदाराच्या त्याने महिलेला संपवण्याचं ठरवलं. ही महिला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही महिला दुचाकीवरुन कामावर निघाली होती. त्यावेळी दारुगोळा कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरुन आलेल्या नसिर आणि त्याच्या साथीदाराने तिल रस्त्यावर तिच्यावर गळावर चाकून सपासप वापर केले आणि तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या रजनी बकेल्लू यांना तातडीने खडकी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
आरोपीला विजापूरमधून अटक
खडकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत होते. एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. आरोपी कर्नाटकातील विजापूरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर खडकी पोलिसांच्या पथकाने लगेच विजापूर गाठलं आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं. त्याला खडकी पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
- श्री गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )