हिंदजागर प्रतिनिधी – मुलीला मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी ४ ते ५ टक्के व्याजाने पैसे घेतले. साडेसात लाखांवर २० लाख रुपये परत केल्यानंतरही अजून साडेआठ लाखांची मागणी करुन ते न दिल्यास जीव ठार मारण्याची धमकी देणार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
निरजकुमार रामचंद्र मंडल (वय ४५, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी पिंपळे गुरव येथील एका ४८ वर्षाच्या नागरिकाने खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. १२९/२३) दिली आहे. हा प्रकार मे २०१७ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी पैशांची गरज होती.तेव्हा त्यांनी निरजकुमार मंडल याच्याकडून ४ व ५ टक्के दराने ७ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्याच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी मे २०२२ पर्यंत एकूण २० लाख ७४ हजार रुपये परत दिले. असे असताना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या घरी, कार्यालयात येऊन शिवीगाळ करत. आणखी ८ लाख ५० हजार रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवत होता. उचलून घेऊन जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी तो देत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करीत आहेत.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )