पुणे प्रतिनिधी – मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण पुणे शहरात मोबाईल रेंज बाबत नागरिकांना समस्या भेडसावत आहे.मोबाईल रेंजच्या तक्रारीने ग्राहक वैतागले आहेत. कोणत्याही कंपनीची रेंज व्यवस्थित मिळत नाही.इंटरनेटची सेवा विस्कळीत आहे.त्यामुळे मोबईल सेवा बेभरोशाची झाली आहे. संबंधीत कंपन्यांनी रेंजबाबत दखल घेऊन मोबाईल सेवा सुरळीत करावी. दैनंदिन जीवनात नागरिक विविध सार्वजनिक सेवांचा लाभ घेत असतात; मात्र या सेवांमध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा त्या सेवा विस्कळीत झाल्यास संबंधित सेवा पुरवठादारांकडून त्याच्या निराकरणासाठी संपर्क क्रमांक दिलेले असतात.जेणेकरून नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे; मात्र हे संपर्क क्रमांकच सध्या शोभेचे किंवा कुचकामी ठरत आहेत
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिक, हॉस्पिटल, दुकानदार तसेच व्यावसायिकांना बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केल्यावरच खंडित वीज पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे अवलंबून असलेले या परिसरातील नागरिक विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांनाही विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याबाबत या परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणतात, की वीज वितरण कंपनी नागरिकांकडून वीज बिल तत्परतेने वसूल करते. एखाद्या ग्राहकाने वेळेवर वीज बिलाचा भरणा केला नाही. तर तत्काळ त्याची वीज तोडली जाते. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे व तो अखंड सुरू ठेवण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. या परिसरात सततचा वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या ” ई सेक्शन ” तक्रारी वाढल्या आहेत व त्यावर ती तोडगा निघाला पाय असेल असं मत सौ.रोहिणीताई बोरसे यांनी व्यक्त केलं
नागरिकांना होणाऱ्या त्रासावरती कुठल्याही प्रकारच प्रशासन गांभीर्य व दखल घेत नाही . हीच वेळ जर निवडणुकीची असते इच्छुक उमेदवारांनी लोकांच्या घरी जनरेटर बसवले असते अशी मुश्किल टीका व राजकीय चिमटा काढायला विसरले नाही. तक्रारी करून सुद्धा तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे व पुढील पंधरा ते वीस दिवसात वरील प्रश्न मार्गी न लागल्यास थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचे निवेदन व माहिती रेंज हिल्स येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रोहिणीताई गणेश बोरसे यांनी दिली.
- श्री.प्रदीप कांबळे ( स्थानिक पत्रकार )