हिंदजागर प्रतिनिधी – ब्रह्मदत्त विद्यालयमानसिक दिव्यांग मुला मुलींचे प्राधिकरण, निगडी,पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना *झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेश्री.विनोद यादव,श्री.राजेंद्र सगर अध्यक्ष काव्य मित्र संस्था, प्रसिद्ध कवयत्री श्रीमती योगिता कोठेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले, शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्याने पाहुण्यांनी औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून उपस्थित विद्यार्थ्यांनचे स्वागत केले. *कार्यक्रमाचे मुख्य आयोजन डॉ. प्रमिला तलवाडकर अध्यक्ष झिलकांत फाऊंडेशन यांनी केले होते.
शैक्षणिक साहित्यासाठी विशेष सहकार्य श्री.सुभाष सांकल उद्योजक जळगाव यांनी देखील केले.* शाळेतील कर्मचारी श्रीमती मालन तिडके, श्रीमती सविता रोडे, दिपाली हराळे यांनी तसेच पालकांनी ही सहकार्य करून कार्यक्रम नियोजन उत्तमरित्या केले.
- श्री.विनोद दत्तात्रय वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )