हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून 5 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही करावाई रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील ब्रिजच्या खाली करण्यात आली. अस्लम अहमद शेख (रा. पवार गल्ली, थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. मु.पो. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातु (रा. महर्षीनगर, झांबरे पॅलेसजवळ, स्वारगेट, पुणे), राहुल उर्फ खंडु गणपत ढवळे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, मु. पो. पिंपळगाव ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना माहिती मिळाली की, जगताप डेरी चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अस्लम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केले.
==== श्री.गणेश मारुती जोशी (स्थानिक वार्ताहर )