हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – णे शहरालगतच्या लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यावेळी मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला होता. त्यावेळी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन मोदी यांनी केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन महिन्यांनंतर ५ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात येत आहेत.
नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे.
यामुळे आता हे टर्मिनल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे टर्मिनल उभारण्यासाठी ५२५ कोटी रुपये खर्च आला आहे. विमानतळावरील या टर्मिनलवर टेकऑफ आणि लॅण्डींगसाठी नव्या सुविधा विकसित केल्या आहेत.टर्मिनलवर एरोब्रिज तयार केले गेले आहे. सध्या पुणे विमानतळावरून ९० विमाने रोज जात आहे. त्यानंतर नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर १२० विमाने रोज टेक ऑफ आणि लॅण्डींग करतील.
=== श्री.प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )