हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, तरीही पालकमंत्री ठरत नव्हते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जुन्याच पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. शिंदे सरकारमध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. आपल्याला पालकमंत्रीपद द्यावं, असं त्यांचं म्हणणं होतं.
अजितदादा गटांकडे सात पालकमंत्रीपदमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता अजितदादा गटाकडील पालकमंत्रीपदांची संख्या सात झाली आहे.
12 जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढील प्रमाणे-
पुणे- अजित पवारअकोला- राधाकृष्ण विखे- पाटीलसोलापूर- चंद्रकांत पाटीलअमरावती- चंद्रकांत दादा पाटीलभंडारा- विजयकुमार गावितबुलढाणा- दिलीप वळसे-पाटीलकोल्हापूर- हसन मुश्रीफगोंदिया- धर्मरावबाबा आत्रामबीड- धनंजय मुंडेपरभणी- संजय बनसोडेनंदूरबार- अनिल भा. पाटीलवर्धा – सुधीर मुनगंटीवार.
== गणेश मारुती जोशी व विनोद वाघमारे (प्रतिनिधी )