हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालायात उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयस्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.अमली पदार्थचे रॅकेट मधे आरोपी असलेला पाटील जर गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने कसा पळाला? तो आजारी होता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच हा वेगवेगळया आजारावर उपचार घेत होता हेही संशयास्पद आहे.त्यामुळे हा सारा घटनाक्रम संशस्पाद शासकीय यंत्रणेला चक्रवणारा आहे. पोलीस, ससून आणि तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागशिवाय हे घडणे शक्य नाही. असे धंगेकर यांनी गृहमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.विविध गुन्ह्याखालील अटकेत असणारे अनेक कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतात ऐशोआराम करतात, असे माध्यमात आलेल्या वृत्तांवरून स्पष्ट होते.
ड्रग्स माफियाललित पाटील याने ससून हॉस्पिटलमधून पलायन केल्यानंतर ससुनचा वॉर्ड क्रमांक 16 हा चर्चेत आला आहे. येरवडा कारागृहातील श्रीमंत आरोपी आजारपणाचे कारण देऊन पैशांच्या जोरावर ससूनच्या वॉर्ड क्रमांमक 16 मध्ये मागील अनेक दिवसांपासून मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.त्यामुळे ससून हॉस्पिटल हे श्रीमंत आरोपींचे दुसरे घर बनल्याचे दिसत आहे. येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे महिनोनमहिने ससूनमध्ये पाहूनचार घेत असतात. कारागृहात अनेक गंभीर आजारांचे रुग्ण असताना देखील त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी मर्जीतील आणि श्रीमंत आरोपींना ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पाठवले जाते. त्यासाठी कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं.
सामाजिक जीवनात वावारताना अशा अनेक घटना कानावर येत असतात त्यामुळे सांस्कृतिक राजधानी पुण्यातील समाजमन भयभीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणे आणि त्यांना न्यायाच्या प्रक्रियेखाली आणणे आवश्यक आहे.या साऱ्या प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने याची विशेष तपास पथक (sit) नेमून चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकारणात विशेष पथक नियुक्त करावे अथवा सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )