हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – भ्रष्टकामामुळे अनेकांच्या मागे ईडी लागली आहे. इडी मागे लागली म्हणजे, पंचवीस वर्षे तुम्ही शेतकऱ्यांना लुटले. त्याचीच फळे आता भोगताय, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंचर येथे बुधवारी (दि.4) केलाकारखानदारांचे साखर कारखाने अडचणीत असल्याची ओरड 25 वर्षांपासून मी ऐकतो आहे. तुम्ही अडचणीत आहात तर परदेशी बनावटीच्या गाड्या तुमच्याकडे कशा आल्या? राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर सरकारचे अजिबात लक्ष नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडे भरमसाठ कर जमा होतो, त्यामुळे सामान्यांवर उपचार करता म्हणजे उपकार करत नाही. सरकारकडे नागरिकांच्या गरजा पुरवायला पैसा नसेल तर सरकार काय आहे, हे लक्षात येते अशी टीका त्यांनी केली.
यावेळी शेट्टी म्हणाले, शेती मूल्य आयोग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जसा गृहीत धरते तसेच कारखान्याला मिळणारे उत्पादन देखील विचारत घेतले जाते. केंद्र सरकारने या वर्षी साखरेची किंमत किमान 3100 रुपये क्विंटल निश्चित केली आहे. म्हणजे मूल्य आयोगाने 3100 रुपये साखर कारखान्याला निश्चित मिळणार हे गृहीत धरले आहे. गेल्या वर्षी मात्र साखर कारखान्याची साखर 3300 रुपये क्विंटलने विकली गेली.दर वाढायला लागले आता ती 3800 रुपयांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कारखान्यांना क्विंटलमागे 500 रुपये उत्पन्न अधिक मिळाले आहे. त्यातले शेतकऱ्याना 400 रुपये मिळावे, ही आमची रस्त आणि अर्थ शास्त्रीय भूमिका आहे. कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून उसातील साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली आहे, त्यामुळे कारखान्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना अधिकचे चारशे रुपये मिळावे ही आमची मागणी असून मागणी पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू असून, मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून या वर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही.
नांदेड येथील घटनेबाबत मी तीव्र संताप व्यक्त करतो. सरकारचे प्रशासनावर लक्ष नाही. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आरोग्य देखील मूलभूत गरज आहे. राज्य शासनाकडे 1 लाख 70 हजार कोटी जीएसटी जमा होतो. मात्र आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अनेक रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक उपलब्ध नाही. औषधे, रुग्णवाहिका अपुरी आहे. शासन आपल्या दारी योजना राबवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातात, मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे – राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना