हिंदजागर न्यूज पुणे – पाऊस थांबल्यामुळे शहरातील खड्डे बुजविण्यासाठी वेगात काम केले जाईल असे प्रशासनाने सांगितलेले असताना आता येरवडा येथील महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट बंद वारंवार बंद पडत आहे. या मशिनचे कंट्रोल पॅनेल खराब झाल्याने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम ठप्प झाले आहे.
पाच पांडव हॉलच्या बाजूला असलेल्या वळणावर मोठा खड्डा मागील महिन्याभरापासून पडला आहे त्यावर पालिकेचे अधिकारी सामान्य नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा लक्ष देत नाही. त्यावर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असता मुख्य खात्याचे श्री.मनोज घाटे यांच्या म्हणण्यानुसार 12 मीटरच्या आतील रस्ते यांची देखभाल व दुरुस्तीचे काम हे घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे आहे व 12 मीटरच्या पुढे असलेले रस्ते हे मुख्य खात्याकडे असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती आमच्याकडे नाही तरी मला त्या ठिकाणांचे फोटो व लोकेशन पाठवा मी ते करून देतो. नेहमीप्रमाणे घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे उप आयुक्त यांना संपर्क करण्यास प्रयत्न केले असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
याच रस्त्यावरती टेलिफोन एक्सचेंज सोसायटीच्या गेट जवळ गेले १५ दिवस झाले पावसा मुळे वाहतुकीच्या रस्त्यावर झाड कोसळले होते त्यानंतर २ दिवस रस्ता बंद होता व पावसामुळे उद्यान विभागाचा कुठलाही अधिकारी जात्यावरती आले नाही दोन दिवसांनी त्यांनी झाड कापून रस्ता मोकळा तर केला पण कापलेल्या फांद्या या रस्त्याच्या बाजूला ठेवून निघून गेले आज त्याला १५ दिवस उलटून गेले पण कुठलाही अधिकारी तिथे येऊन हा पाला उचलायला तयार नाही . अपेक्षित होतं की १ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियाना मध्ये हा रस्ता साफ केला जाईल पण त्यामध्ये पण नागरीकांचा अपेक्षा भंग झाल्याचे दिसून येत आहे.
==== प्रदीप कांबळे ( स्थानिक वार्ताहर )